जर ED, CBI चे प्रयत्न संपले तर सरकार पाडायला महाराष्ट्रात Army आणा – Sanjay Raut यांची भाजपवर टीका

टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 जुलै 2021 – सरकार पाडण्यासाठी विरोधी भाजप पक्ष वाटेल त्या थराला जात आहे. त्यामुळे ईडी, सीबीआयचे प्रयत्न संपले तर सरकार पाडायला महाराष्ट्रात आर्मी आणा, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.

मागील तीन आठवडे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू होते. त्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आँलवेल नाही, असे दिसून येत होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी दिल्ली ते मुंबई अशा ठिकाणी भेटी, बैठका वाढवल्या होत्या. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता संघर्ष सुरू होणार का…? अशी मोठी चर्चा राजकारणात होत आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेत्यांच्या विरोधात मागील काही दिवसांपासून ईडी, सीबीआयकडून कारवाई होत आहे. यावर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हणाले कि, सरकार अस्थिर करण्यासाठी ईडी, सिबीआय आणि इनकम टँक्सचा वापर होत आहे.

ईडी, सिबीआय आणि इनकम टँक्सचे प्रयत्न संपले की मग महाराष्ट्रात सैन्य आणा… राज्य सरकार पाडायला. तोफा मारा आमच्यावर…, जेवढे तुम्ही आमच्यावर हल्ले कराल तेवढे आम्ही तीनही पक्ष मजबूत होऊ घट्ट बनू … आणि झालेलो आहोत.’ त्यामुळे हे सरकार पडणार नाही, असा संदेश राऊत यांनी दिला आहे.

राऊत म्हणाले, राज्यपालांना विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत कळकळ असेल तर राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनीही पत्र पाठवलं आहे. राज्यपालांना जेवढी कळकळ विधानसभा अध्यक्ष पदासाठी आहे.

तेवढी कळकळ विधानपरीषदेच्या 12 जागांसाठी असती तर आम्हाला आनंद झाला असता. पण, तसं होताना दिसत नाही. राज्यपालांनी किती ही पत्र पाठवली, तरी अस्वस्थ व्हायचं कारण नाही. पत्रांचा ओघ वाढलाच तर त्यासाठी एक वेगळा डेक्स निर्माण करावा लागेल. विधानसभा अध्यक्ष पदासाठी तीनही पक्षांत एकमत आहे.

Please follow and like us: