TOD Marathi

बीड वासियांसाठी आज ऐतिहासिक दिवस (Historical Day) आहे. आष्टी ते नगर (Ashti To Nagar) रेल्वे मार्गावर आज पहिली रेल्वे धावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, State Railways Minister Raosaheb Danve, BJP Leader Pankaja Munde, Pritam Munde) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. गेली अनेक वर्ष या मार्गावर रेल्वे धावण्यासाठी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मोठा लढा दिला होता आणि बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर बीड जिल्ह्यातून ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एकाच हेलिकॉप्टर मधून प्रवास केला. गेले काही दिवस पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या, त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी येताना देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी एकाच हेलिकॉप्टरमधुन प्रवास केला. त्यामुळे या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस काय बोलणार? आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचं लक्ष लागलं आहे.