नाशिक :
नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय. गंगापूर धरण जवळपास ७५ टक्के भरले आहे आणि या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. (Heavy rain in Nashik, Flood situation in nearby area) गोदावरी नदीलाही पूर आला असून नाशिकमधील मंदिरे पाण्याखाली गेलीत. नाशिक जिल्हयाला पुढील तीन दिवस रेड अलर्टची सूचना देण्यात आली आहे. (Red alert given to Nashik for next 3 days)
तसेच नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ही प्रशासनाने दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने धरणातुन टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरातून प्रवाहित असणाऱ्या गोदावरी नदीलाही मोठा पूर आला आहे. गोदाकाठावर असलेला प्रसिद्ध रामसेतू पूल हा पुराच्या पाण्याखाली गेला आहे. (RamSetu bridge under water) नदीच्या दोन्ही बाजूला असलेली छोटी छोटी मंदिरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत तर मोठ्या मंदिरांमध्येही पाणी शिरले आहे.
शहरात पावसाची संततधार सुरूच असून 14 तारखेपर्यंत हवामान खात्याने नाशिकला रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आतापर्यंत दारणा, गंगापूर, नांदूर माध्यमेश्वर, चनकापूर, पालखेड या धरणांमधुन लाखो क्युसेस विसर्ग सुरू असल्याने जायकवाडी धरण भरण्यास मदत होणार आहे. सप्तश्रृंगी गडाच्या वरच्या बाजूने डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे पायऱ्यांना धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले.