TOD Marathi

मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीबाबत दोन्ही बाजूने चर्चा झाली. शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन निर्णय घेतलेले आहेत. बैठकीत सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच दिले आहेत, अशी माहिती शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिली. मातोश्रीवर आज खासदारांची एक बैठक बोलावली होती, यामध्ये राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा झाली. यानंतर राऊत माध्यमांशी बोलत होते. (Meeting of Shivsena MP called on Presidential Election)

एनडीएच्या उमेदवारास विरोध असल्याच्या चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले, जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखाचा निर्णय असेल, तो मला मान्य आहे. माझा कुठल्या गोष्टीला विरोध आहे, या बातम्या चुकीच्या आहे. त्यांनी माहित नाही. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही राऊत म्हणाले. (Sanjay Raut)

आमचे पक्षप्रमुख निर्णय घ्यायला समर्थ आहेत आणि ते योग्य निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या, देशाच्या भावना समजून घेतील. त्या निर्णयाच्या पाठीमागे सर्व खासदार ऊभे राहतील, असं देखील संजय राऊत म्हणाले. (Final decision will be taken by party chief Uddhav Thackeray, Says Sanjay Raut)

आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या हकालपट्टीवर बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आहे. दुसरी कोणाची नाही. त्यामुळे बांगर यांना हटवण्याचे पूर्ण अधिकार पक्षप्रमुखांना आहेत. त्यानुसार हिंगोलीत नवे जिल्हे प्रमुख नेमले जातील हेही राऊत यांनी स्पष्ट केले.