TOD Marathi

पुणे:
बाजीप्रभू देशपांडे यांचे तेरावे व चौदावे वंशज यांनी पत्रकार परिषद घेतली. हर हर महादेव या चित्रपटावर अनेक आक्षेप घेण्यात आले. यामध्येच आता बाजीप्रभू देशपांडे यांचे तेरावे आणि चौदावे वंशज यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे हे अत्यंत भावनिक व्यक्ती दाखवण्यात आले आहेत, जे की त्यांना चुकीचे वाटत आहे. त्याचप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या भावामध्ये लहानपणी झालेला घातपात हा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे, याला इतिहासात काही पुरावे आहेत का? अशी देखील विचारणा करण्यात आली. त्यांच्या गावातील काही दृश्य दाखवण्यात आलेले नाहीत, तसेच बाजीप्रभू देशपांडे यांनी मंदिर तोडण्यासाठी बांधली असे देखील संदर्भ देण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हा या चित्रपटांमध्ये केलेला आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या गावामध्ये किंवा गावाला लागून कोणत्याही प्रकारे समुद्र नाही तरी देखील तिथे जवळ समुद्र आहे आणि तिथून महिलांची तस्करी केली जात होती अशा प्रकारच्या चित्र दाखवण्यात आले आहे. या दृश्यांमध्ये बदल न केल्यास कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी दिला आहे.

यापूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटातील काही दृश्य दाखवत आक्षेप घेतला होता, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्या या भूमिकेला समर्थन दिले होते. संभाजी ब्रिगेडने देखील या चित्रपटाचा विरोध केला होता. काही ठिकाणी शो बंद पाडण्यात आले होते. त्यातच आता बाजीप्रभु देशपांडे यांच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.