टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 मे 2021 – राज्यासह देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुले रुग्ण संख्या वाढत आहे. असे असताना औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांचा तुटवडा भासत आहे. अशावेळी ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे.
द असोसिऐटेड चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेने अर्थमंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून जीएसटी कमी करण्याची मागणी केलीय. त्याच पत्राचा आधार घेत जयंत पाटील यांनी ऑक्सिजन व ऑक्सिजनजन्य साहित्यावर जीएसटी लावला जात आहे. हा जीएसटी हटविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
हा जीएसटी हटवल्यास आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.