आता टु-व्हीलर्स स्वस्त होणार?; GST परिषदेची 28 मे रोजी बैठक

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 16 मे 2021 – देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ अधिक होत असल्यामुळे महागाई देखील वाढत आहे. त्याचा परिणाम दुचाकी खरेदी- विक्रीवर होत आहे. अशात जीएसटी परिषदेकडून दिलासा देणारे वृत्त समोर येत आहे. आपल्या घरांत पाईपद्वारे येणारा गॅस-PNG आणि टु-व्हीलर्सच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण GST परिषद नैसर्गिक गॅसला जीएसटी प्रणालीत आणण्याचा विचार करीत आहे. यामुळे पीएनजी गॅस अधिक स्वस्त होईल, असा अंदाज आहे.

दुसरीकडे, पीएनजी गॅस आणि टु-व्हीलर्सवंरील कराच्या दरात कपात होणार आहे. जीएसटी परिषद हे महत्वाचे दोन्ही निर्णय येत्या 28 मे रोजी आपल्या बैठकीमध्ये घेतील, अशी शक्यता आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतरची ही पहिली बैठक असणार आहे.

येत्या 28 मे रोजी जीएसटी परिषदेच्या बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. या बैठकीमध्ये इनव्हर्टेड ड्युटीची रचना निश्चित करण्याच्या उपायांची घोषणा केली जाणार आहे.

या बैठकीमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या सेस कलेक्शनात घट होण्याच्या शक्यतेवर कम्पनसेशन सेसवर चर्चा केली जाईल. जीएसटी परिषदेची शेवटची बैठक मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती. मागील बैठकीमध्ये जीएसटी संकलन कमी करण्यासह केंद्राच्या कर्ज घेण्याच्या फॉर्म्युलावर आणि त्याच्या भरपाईवर चर्चा झाली होती.

Please follow and like us: