नवी दिल्ली: आज केंद्रीय गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्याला नक्षलवादाशी लढण्यासाठी १२०० कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारने नक्षलवाद आणि माओवादासारख्या देशविरोधी घटकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे धोरण ठरवत असून, यामध्ये राज्यांनाही विचारात घेतले जाणार आहे. त्यासाठी देशातील नक्षल आणि माओवादग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.
दरम्यान, या बैठकीला उद्धव ठाकरेंशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित आहेत. मात्र काही राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.