TOD Marathi

लातूरचे माजी MP Prof. Dr. Sunil Baliram Gaikwad ‘बुद्धा पीस अवॉर्ड 2021’ने सन्मानित ; जागतिक शांततेसाठी केलेल्या कार्याची घेतली दखल

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दिल्ली, दि. 8 ऑगस्ट 2021 – जागतिक शांततेसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना आज दिल्ली इथे यंदाचा ‘बुद्धा पीस अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.

दिल्ली इथल्या म्यानमार अेम्बसीच्या कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पडला. मैत्री पीस फाउंडेशन आणि म्यानमार अेम्बसीच्या संयुक्त विद्यमानाने २०२१ चा हा मानाचा पुरस्कार अखिल भारतीय भिक्खू संघनायक पूज्यनीय भंते ए. बी. ज्ञानेश्वर आणि भारत सरकारचे केंद्रीय पेट्रोलियम तथा श्रम रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि म्यानमारचे अेम्बसी मोइ क्याओ औंग़ यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.

16 व्या लोकसभामध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि जागतिक शांततेसाठी झालेल्या भूतानच्या सोशल जस्टिस स्टँडिंग कमिटीला भारतीय संसदेच्या शिष्टमंडळाचे चेअरमन या नात्याने माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी अत्यंत चांगला कामाचा ठसा भूतानच्या बैठकीत उमटवला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा ‘बुद्धा शांतता पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

डॉ. सुनील गायकवाड यांना याच महिन्यामध्ये हा तिसरा अवॉर्ड मिळाला आहे. इंडियन स्टार अवॉर्ड २०२१, छत्रपती शिवाजी महाराज अवॉर्ड २०२१ आणि आज मिळालेला ‘बुद्धा पीस अवॉर्ड २०२१’ अशा मानाच्या पुरस्कारांनी त्यांचे आणि त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केलं आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक पद्मश्री कुमार सानू, प्रसिद्ध फिल्म निर्माता रमेश थेटे तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर यांना देखील हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. या पुरस्काराबद्दल डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.