TOD Marathi

अल कायदाने Delhi International Airport उडवण्याची दिली धमकी ; Alert जारी, सुरक्षा वाढवली

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दिल्ली, दि. 8 ऑगस्ट 2021 – दहशतवादी संघटना अल कायदाने दिल्‍लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवण्याची धमकी दिलीय. दिल्ली पोलिसांना शनिवारी सायंकाळी अलकायदाच्या नावे ई-मेल आला होता.

यात येत्या काही दिवसामध्ये आयजीआय एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. ही धमकी मिळताच दिल्लीमध्ये अलर्ट जारी केला असून दिल्ली विमानतळावरही सुरक्षा वाढवली आहे.

दिल्‍ली पोलिसांना शनिवारी एक ई-मेल आला होता. ज्यात म्हटले की, करणबीर सूरी उर्फ मोहम्मद जलाल आणि त्याची पत्नी शैली शारा उर्फ हसीना रविवारी सिंगापूरवरुन भारतामध्ये येत आहेत. ते दोघे आयजीआय एअरपोर्टवर येत्या काही दिवसात बॉम्ब ठेवणार आहेत.

याअगोदर मिळाल्या आहेत धमक्या –
ई-मेलच्या तपासानंतर डीआयजींनी सांगितले, याअगोदर ही याच नावाने अशाच स्वरुपाची धमकी मिळाली होती. याला बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटीने विशिष्ट नसल्याचे घोषित केलं.

तरीहि दिल्ली एअरपोर्टच्या सिक्योरिटी ऑपरेशंस कंट्रोल सेंटरने सर्व सुरक्षा यंत्रणांना याची माहती देऊन अलर्ट जारी केलाय.