मुंबई: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. आता यात त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख हे आता ईडीच्या रडारवर आहेत. ईडीनं ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.
अनिल देशमुखांचे सर्व पैशांचे व्यावहार मुलगा ऋषिकेश पाहात असल्याचं तपासात उघड झालं आहे, त्यामुळं ईडीनं ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी हे समन्स बजावण्यात आलं आहे.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांची दिवाळी कोठडीत जाणार आहे. मंगळवारी, पहाटेच्या सुमारास अनिल देशमुख यांना १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली.