टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 जून 2021 – ईडीकडून 100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दोन वेळा कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झालीय. ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे दिल्यामुळे अनिल देशमुख यांची धावाधाव सुरू झालीय. ईडीने कारवाईचा वेग वाढवला असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे.
100 कोटी वसुली प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. ईडीने पुन्हा एकदा देशमुख यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार होते. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी ईडीला विनंती करणारे एक पत्र पाठविले आहे.
या दरम्यान, आज दिवसभरात ईडी कार्यालयाकडून अनिल देशमुख यांच्याविरोधात कशी कारवाई केली जाते?. हे पाहून संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे.
अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमुळे पक्षाची झालेली बदनामी, त्यात येत्या काळात पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी ही बैठक होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
ही बैठक राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी बोलाविली आहे. या बैठकीमध्ये कोणता निर्णय घेणार आहे?. याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरूय.