पंजाब काँग्रेसचे माजी नेते सुनील जाखड यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीस्थित भाजपा मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांना सदस्यत्व दिले. अलीकडेच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या पहिल्याच दिवशी सुनील जाखड यांनी भावनिक वक्तव्ये करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सुनील जाखड यांचे काँग्रेससोबतचे जवळपास ५० वर्षांचे नातं होतं. त्यांचे वडील बलराम जाखड हे देखील काँग्रेसचे नेते होते आणि ते केंद्रीय मंत्रीही होते.
Former Punjab Congress Chief Sunil Jakhar joins Bharatiya Janata Party in presence of party president JP Nadda in Delhi pic.twitter.com/eoUHhHH1Ul
— ANI (@ANI) May 19, 2022
काही दिवसांपूर्वीच सुनील जाखड यांच्यावर पक्षानं शिस्तभंगाची कारवाई केली होती आणि दोन वर्षांसाठी पक्षातील सर्व पदांपासून दूर राहाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नाराज असलेल्या जाखड यांनी फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं होतं.
“मी पंजाबच्या बंधुत्वासाठी लढत आहे. जे काम एके-४७ च्या गोळ्या करू शकल्या नाहीत, ते काम काँग्रेसने आपल्या जिभेने करून दाखवले. त्यांनी केवळ हिंदू बांधवाचाच नव्हे तर शीख बांधवाचाही अपमान केला,” असे सुनील जाखड यांनी भाजपा पक्ष प्रवेशानंतर म्हटले आहे.
I’m fighting for Punjab’s brotherhood. The work which bullets of AK-47 were not able to do, they (Congress) did it with their tongue that person from a particular community can’t be elected (as CM). They not only insulted Hindu brotherhood but also Sikh brotherhood: Sunil Jakhar pic.twitter.com/aDnBHpljQi
— ANI (@ANI) May 19, 2022
काँग्रेसमध्ये असतानाही ते वेगळ्या प्रतिमेचे नेते होते. सुनील जाखड यांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी काम केले. आज पंजाबमधील राष्ट्रवादी शक्तींमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. मला खात्री आहे की त्यांच्यासोबत भाजपा पंजाबला एका नव्या उंचीवर नेईल. यामध्ये सुनील जाखड महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. असं वक्तव्य भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सुनील जाखड यांना पक्षाचे सदस्यत्व देताना केलं आहे.