TOD Marathi

10 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी BJP चे माजी मंत्री Shamaprasad Mukherjee यांना अटक

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. २२ ऑगस्ट २०२१ – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकच्यावेळी भाजमध्ये प्रवेश केलेले तृणमुल काँग्रेसचे माजी मंत्री शामाप्रसाद मुखर्जी यांना आज भ्रष्टाचारप्रकरणात अटक केली आहे.

त्यांच्यावर सुमारे दहा कोटी रूपयांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. एका स्थानिक स्वराज्य संस्थेतील ई टेंडरिंग मध्ये सन २०२० मध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. सुमारे ९ कोटी ९१ लाख रूपयांच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आहे.

यात त्यांची चौकशी केली पण, त्यात त्यांना समाधानकारक उत्तरे न देता आल्यामुळे त्यांना अटक केली आहे. या दरम्यान भाजपनेही त्यांची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय.

भाजपच्या एका स्थानिक नेत्याने म्हटले आहे की, निवडणुकीच्या काळात ते भाजपमध्ये आले होते, हे खरे आहे पण सध्या ते भाजपमध्ये सक्रिय नाहीत.