TOD Marathi

कंडोमच्या सहाय्याने Private Parts मध्ये लपवलं 50 लाखांचं Gold ; 3 महिलांना अटक

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. २२ ऑगस्ट २०२१ – देशातील वाढती तस्करी पाहून एनसीबीने आता कारवाई करण्यावर भर दिला आहे, असे असले तरी गुन्हेगार तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडियांचा वापर करत आहेत. अशातच पुन्हा एकदा मुंबई विमानतळावर तस्करीसाठी महिलांनी ज्या पद्धतीचा वापर केला होता, हे ऐकून अधिकारीही शॉक झालेत.

याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर तीन महिलांना सोनं तस्करीसाठी कंडोमचा उपयोग केला आहे. त्यांनी कंडोमध्ये सोनं भरून ते प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं लपवलं होतं. मात्र, या महिला जेव्हा स्कॅनिंगसाठी गेल्या तेव्हा त्यांना महिलांच्या पोटातून सुमारे ५० लाखांहून अधिक किमतीचे सोनं सापडलं आहे.

याप्रकरणी एनसीबीच्या टीमने मुंबई विमानतळावरुन तीन महिलांना अटक केली आहे. स्कॅनिंगदरम्यान महिलांच्या पोटातून सुमारे ५० लाखांहून अधिक किमतीचं सोनं सापडलं आहे. पुढे चौकशीत या महिला पँटमध्ये ड्रग्ज लपवून आणत आहेत, असे समोर आलं आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या महिला केनियातील आहेत. त्या केनियाहून कतारला गेल्य होत्या. त्यानंतर मुंबईला आल्या होत्या. एनसीबीने त्या तीन महिलांना कस्टम्सकडे सोपवलं आहे.