TOD Marathi

नागपुर : आपण कुठेही फिरायला गेलो की त्या ठिकाणी काय खायचं हा प्रश्नही पडतोच. नियमितपणे आपण जे खातो त्या पेक्षा त्या त्या ठिकाणी काय वेगळं आणि चांगलं मिळू शकेल ते खाण्यासाठी आपण पसंती देत असतो. मात्र हे सांगणार तरी कोण की खायचं तरी काय?

आज अनेक लोकं फुड व्लॉगर्स म्हणून काम करतात, वेगवेगळ्या ठिकाणी मिळणारे पदार्थ, त्यांची वैशिष्ट्ये इ. आपल्याला सांगतात. नागपूरची प्रतिक्षा जयस्वाल ही तरुणी देखील फुड व्लॉगिंग करते. तसं तर प्रतीक्षाने एमबीए केलय. लहानपणापासूनच खाद्य पदार्थ बनवणं आणि खाणं ही तिची लहानपणापासूनची आवड आणि हीच आवड हळूहळू तिचा व्यवसाय बनली. प्रतिक्षा मागील ४ वर्षापासून फूड व्लॉगिंग करतेय. गुगल आणि ज़ोमॅटो (Zomato) वर रिव्ह्यू देखील करतेय.

पूर्वी प्रतीक्षाचं कुटुंब किंवा मित्र मैत्रीण प्रतीक्षाला विचारून हॉटेल किंवा तिथला मेन्यू एक्सप्लोर करायचे. पुढे प्रतिक्षाने एक दिवस स्वतःच फूड व्लॉगिंगच अकाउंट सुरू केले. आता कुटुंबीय मित्रपरिवारासह अनेक लोक याबाबत तिचा सल्ला घेतात. इंस्टाग्रामवर प्रतिक्षाचं ‘बिग लाईफ’ पेज आहे आणि हजारो लोक तिला फॉलो करतात. विविध सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिने अनेकांची पसंतीही मिळवली आहे. प्रतीक्षा फूड व्लॉगिंगसह आवडीने प्रवासही करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरसह विविध ठिकाणी होणाऱ्या इव्हेंटचीही माहिती लोकांना देत असते.

प्रतिक्षा नागपूर सोबतच महाराष्ट्रातील आणि देशाच्या अन्य भागातील हॉटेल्स, कॅफे, आणि खाद्य संस्कृती एक्सप्लोर करतेय. व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना खानपानाबद्दल सांगणे, लोकांना आवडेल आणि सोप्प वाटेल अशा पद्धतीने सांगणे, थोडं मजेशीर मात्र खरी माहिती खवैय्या लोकांना देणे हे प्रतिक्षाच्या व्लॉगिंगचे वैशिष्ट्ये आहेत.
त्याच बरोबर प्रतिक्षाचं ‘अपना किचन’ हे एक होम किचन सुद्धा आहे. त्यामध्ये तिने मोजकाच मेनू ठेवला आहे. खाद्य प्रेमींची पसंती देखील तिच्या ‘अपना किचन’ला मिळत आहे. तर मग तुम्ही पण ठरवा कुठे काय खायचं ?