TOD Marathi

छत्रपती संभाजीनगर | आज सामना देखील म्हणाला आहे सांभाळून राहा, राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावे लागते. ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असणारे पुरावे घेऊन यायचं, आधी अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचं आणि आता अजितदादा किसिंग किसिंग चालू आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणी कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिंकणार असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. शिंदे गट लढेल किंवा भाजप लढेल आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुरून उरणार असे म्हणत दानवेंनी शिंदे गटावर निशाना साधला.

हेही वाचा ” …आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय कधी? विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…”

यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनाही टोला लगावला. डॉ. भागवत कराड माणूस चांगला पण, ते नेता नाही. ते चांगले डॉक्टर आहेत, चांगले बालरोग तज्ञ आहेत. पण, नेतृत्व करु शकत नाहीत अशा शब्दात त्यांनी कराड यांना टोला लगावला. भावना गवळी प्रकरणातील सीए आणि किरीट सोमय्या हे दोघे वादग्रस्त होते, सीए जेलमध्ये होते तर किरीट सोमय्याचे तुम्हाला माहीतच आहे. असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या आणि खासदार भावना गवळी यांच्यावर आरोप करणारे सीए उपेंद्र मुळे यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे. तसेच किरीट सोमय्या शिवसेनेला घाबरतात म्हणून गुप्त दौरा. खुला दौरा करायचा असता तर शहरात येऊ शकले नसते.

आमदारांचे वागणे आणि त्यांच्यावर असणाऱ्या केसेस असता कुणावर कारवाई झाली जनतेने याकडे लक्ष द्यायला हवे. सर्वसामान्यांनी जर अस कृत्य केलं असतं तर सरकारने काय कारवाई केली असती. पोलीस जर सरकारच्या ताटाखालचा मांजर बनत असेल पोलीस जर सरकारचं गुलाम बनत असेल आणि पोलीस सुद्धा सरकारची हुजरेगिरी करत असेल तर जनता योग्य वेळी न्याय देईल. असे म्हणत त्यांनी पोलीस खात्यावर ताशेरे ओढले आहेत.