TOD Marathi

मुंबई | उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच बिहारमधील पाटणा येथे पार पडलेल्या विरोधकांच्या संयुक्त बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला उपस्थित राहिल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पाटण्याला गेले, अशी टीका फडणवीसांनी केली. यावर उद्धव ठाकरेंनी आक्रमक होत मला तुमच्या कुटुंबावर बोलावं लागलं तर तुम्हाला शवासन करावं लागेल, असा इशारा दिला. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजप परिवार एक खुली किताब आहे. ज्या ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’बाबत तुम्ही बोलत आहात, तो आरोपपत्राचा भाग आहे. हे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. ते जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. पण मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचं मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.”

हेही वाचा”…विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर; मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतानाही मुखदर्शन सुरु राहणार”

“चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर, सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद घरात कसे ठेवले? मुंबईला कुणी लुटले? मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले? मराठी माणसाला कुणी ओरबाडले? १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते? यावर पुस्तक काढा. तुमचं हिंदुत्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार,” असंही फडणवीस म्हणाले.

“आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणारदेखील नाही. तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या. आता शवासन कुणाला करावं लागतं, ते बघूच” असा थेट इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज