टिओडी मराठी, दि. 3 बीड ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकारवर आरोप करणे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना महागात पडलं आहे. चित्रा वाघ यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. चित्रा वाघ आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहत असतात. मात्र, चित्रा वाघ यांच्या विरोधात बीड जिल्ह्यातील शिरूर कासार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश अध्यक्षांनी एका मुलीवर बलात्कार केला होता. त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असताना पोलिसांनी अटक केली नाही, उलट बलात्काराच्या प्रकरणात कारवाई करण्याची घाई केली.
महाविकास आघाडीचे सरकार बलात्कार्याला पाठीशी घालत आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांविरोधात राष्ट्रवादीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी बदनामी केली म्हणून हा गुन्हा दाखल केलाय.
राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर औरंगाबादेमध्ये एका तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावरून भाजपने त्यांच्या विरोधात रान उठवले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणि गृह खाते राष्ट्रवादीकडे असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी पर दबाव आणला जात आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता.
भाजप नेत्या चित्रा वाघ मागील आठवड्यात बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या असता या शिरूर कासार येथे या प्रकारना संदर्भात सरकारवर आरोप केले होते.