TOD Marathi

भाजपाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांचं ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या हत्या प्रकरणात संजय राठोड यांची चौकशी करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांनी राजीनामा देखील दिला होता. (Sanjay Rathod in Maharashtra Cabinet) भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात अतिशय भक्कमपणे बाजू मांडली होती. त्याच संजय राठोड यांचा समावेश आता शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात झाला आहे. (Chitra Wagh tweeted)

संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात स्थान निश्चित झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट केलं आहे. “पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जातं हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धच्या माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. लढेंगे भी और जितेंगे भी…” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज पार पडला. या विस्तारामध्ये शिंदे गटाच्या वतीने संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.