TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 ऑगस्ट 2021 – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या बैठकीत जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईक नवरे, सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

केंद्रीय सहकार मंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर अमित शाह यांनी पहिल्यांदा आज शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत रायगडमध्ये ‘एनडीआरएफ’ केंद्राबाबत आणि NDRF च्या काही नियमांमध्ये आवश्यक बदलासंदर्भात चर्चा झाली आहे. या बैठकीत साखरेची विक्री किंमत वाढवण्याची मागणी केली आहे, असे सांगण्यात येते.

एकीकडे आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र करत नरेंद्र मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखत आहेत. खासदार राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती.

राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट डिप्लोमसीची चर्चा सुरू असताना शरद पवार-अमित शहा बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. राहुल गांधींनी बोलावलेल्या बैठकीमध्ये देशातील 14 पक्षांचे सुमारे 100 खासदार उपस्थित होते, असे समजते.

हे आहेत बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे :
या बैठकीमध्ये साखरेची विक्री किंमत वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केली आहे. यावेळी गृहमंत्र्यांनी अशी माहिती दिली आहे की, लवकर सरकार इथेनॉलबाबत नवीन धोरण आणण्याच्या विचारामध्ये आहे.

रायगडमध्ये एनडीआरएफ केंद्र उभारण्यासाठी आणि पूर आणि वादळातील विनाशापासून सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या नियमांमध्ये बदल करावेत, अशी मागणी हि केली आहे.