टिओडी मराठी, मुंबई, दि. 7 ऑगस्ट 2021 – मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बॉम्ब ठेवला आहे. असा निनावी फोन आल्यानंतर रेल्वे आणि स्थानिक पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली. यानंतर तातडीने घटनास्थळी पोलीस, बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथक दाखल झाले. CSMT परिसराची तपासणी केल्यानंतर संशयास्पद वस्तू किंवा तसे काही आढळून आले नाही. मात्र, मुंबई पोलिसांकडून हॉक्स कॉल (निनावी फोन ) करणाऱ्या इसमाचा शोध सुरु केला आहे.
मात्र, निनावी फोननंतर मुंबईतील भायखळा, दादर अशा अनेक रेल्वे स्थानकावर हि जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात केली होती. या स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी केली जात होती.
शुक्रवारी रात्री सुमारे 9 च्या सुमारास रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. त्यानंतर मुंबई पोलिस, जीआरपी, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवलं.
तत्पूर्वीही मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे दिली होती. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. कथित बाॅम्बचा तपस सुरु केला. यात काही तरुणांना अटक केली होती.