TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 7 ऑगस्ट 2021 – नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क चालविणाऱ्या ड्रग तस्कराला नवी मुंबई येथून कारवाई करून अटक केली.

स्टीफन सॅम्युअल टोनी असे या ड्रग तस्कराचे नाव असून त्याच्याकडून सुमारे 102 ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे.

ही कारवाई करीत असताना टोनी याने एनसीबीच्या अधिकार्‍यांवर हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नवी मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

स्टीफन सॅम्युअल टोनी हा कोकेनचा पॅन इंडियामध्ये पुरवठा करत होता. कोलंबियाहून इथिओपिया मार्गे तो मुंबईत कोकेनच्या नेटवर्कमार्फत पुरवठा करण्यात महत्वाचा दुवा असल्याचं उघड झालं आहे.

तो कोकेनच्या पुरवठ्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला होता. मागील काही महिन्यांपासून एनसीबी मुंबईचे अधिकारी त्याच्यावर पाळत ठेवून होते.

त्याच्याकडे कोकेन आहे, अशी माहिती मिळाल्यावर नवी मुंबईतील खारघर इथल्या सेक्टर 30 येथे शुक्रवारी पहाटे कारवाई करुन स्टीफन टोनीला अटक
केली.

त्यावेळी त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत अधिकार्‍यांवर हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाले. त्यानंतरही पोलिसांनी त्याला जेरबंद करून त्याच्याकडून 102 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.

शासकीय कर्तव्यात सरकारी अधिकार्‍यांना अडथळा आणल्याप्रकरणी स्टीफन सॅम्युअल टोनीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. एनसीबी मुंबईने अंमली पदार्थाच्या तस्करांविरोधात सातत्याने कारवाई केली आहे. 2021 मध्ये आतापर्यंत 22 परदेशी नागरिकांना अटक केलीय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज