शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेच्या त्या आमदारांच्या पाठींब्यावर भाजपने सरकार स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात काम सुरु केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतला आणि जिल्हा नियोजन समितीच्या ६०० कोटींच्या कामांना ब्रेक दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील काल मंत्रालयातील कामाचा आढावा घेतला. बंद असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांनी पहिल्याच दिवशी माजी मंत्री छगन भुजबळ यांना दणका दिला आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या (Nashik DPDC) ६०० कोटींच्या कामांना ब्रेक दिला आहे. ६०० कोटींच्या कामांना घाईघाईने मंजूरी कशासाठी दिली, असा प्रश्न नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे यांनी उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बैठक घेऊन ५६७ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिली होती. यावरुन आरोप करण्यात आले होते.