TOD Marathi

तब्बल अकरा दिवस राज्याबाहेर असलेले शिंदे गटाचे आमदार आज अखेर मुंबईत दाखल होणार आहेत. (Shinde group mlas to come in Mumbai) सुरुवातीला गुजरातमधील सुरत येथे असलेले आमदार हे पुढे आसाममधील गुवाहाटीला गेले. त्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या घडामोडी झाल्या, (Maharashtra Political Crisis) त्यानंतर हे सर्व आमदार गोव्यात आले आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हे सर्व आमदार आता मुंबईकडे येण्यासाठी निघाले आहेत. (Ekanath Shinde CM) गोवा विमानतळावरून एका स्पेशल फ्लाईटने हे सगळे आमदार मुंबईत दाखल होत आहेत. ही विशेष फ्लाईट विमानतळावर तयार आहे आणि गोव्यात असलेल्या ताज कन्वेंशन या हॉटेलमधून हे आमदार आता विमानतळाकडे निघाले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्ष गेले काही दिवस राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याच राजकीय सत्तासंघर्षात आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेना आणि भाजप यांची परंपरागत युती होती, ती पुढे कायम ठेवली पाहिजे अशी भूमिका घेत भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका महाविकास आघाडीत राहण्याची होती. काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना न्याय देताना आम्हालाच न्याय मिळाला नाही असं म्हणत या सर्व आमदारांनी बंड केलं.

या सगळ्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामा दिला आणि भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गटाला जवळ करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवला जवळपास 11 दिवसांच्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्र बाहेर गेलेले सगळे आमदार मुंबईत परत येत आहेत. गोव्यातील हॉटेल मधून एअरपोर्टकडे जाताना गोवा पोलिसांनी देखील आमदारांना कडेकोट सुरक्षा दिलेली आहे.

हे सगळे आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर आणखी काय घडामोडी होतात, याचीही उत्सुकता सर्वांना लागून आहे. यांपैकी अनेक आमदारांना मंत्रिपदांच्याही अपेक्षा आहेत.