TOD Marathi

मुंबई

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ससंदेतील आंदोलनाला बंदी, असंदीय शब्द, राज्यातील सत्तांतर, फुटीर आमदार यासह शिंदे फडणवीस सरकारवर भाष्य करताना टीका केली. संसदेत परखड शब्दांवर बंदी आणणं हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे. संसदीय लोकशाहीवर जबरदस्त हल्ला आहे. उद्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे त्यात आम्ही याचा उहापोह करणार आहोत. संसदेच्या आवारात आंदोलनाला बंदी, संसदेच्या पायऱ्यांवर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या आवारात आंदोलन करत होतो, त्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही भीती कशाची आहे? असा प्रश्न उपस्थित करत हा लोकशाहीला धोका आहे, असंही संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut on Parliament)

हे सरकार लोकशाहीच्या मार्गानं निवडून आलेलं सरकार आहे. आणि याच लोकशाहीची भीती जर सरकारला वाटत असेल तर देशातील लोकशाहीला मोठा धोका आहे. लोकांचे प्रतिनिधी परखड, स्पष्ट आणि कडक भाषेत देशातील प्रश्न मांडत असतील आणि त्यांची मुस्कटदाबी करण्यात येत असेल तर या देशात लोकशाही आहे का असा प्रश्न जगाला पडेल, आम्हाला देखील तो प्रश्न पडेल, असं राऊत म्हणाले. आणीबाणी (Emergency) असो किंवा अशा प्रकारची मुस्कटाबी असो त्याविरोधात देशातील जनतेनं आवाज उठवला आहे.जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पाय कापण्याचे हे प्रयोग आहेत. (Its harmful to democracy, Says Sanjay Raut) यामध्ये राज्यकर्ते यशस्वी झाले तर आणखी पुढचं पाऊल टाकतील, असंही संजय राऊत म्हणाले.

बेईमान हा शेवटपर्यंत बेईमान नाही हेच सांगत असतो आणि शेवटपर्यंत कारणं देत असतो. तुम्ही शिवसेना सोडलेली आहे, तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापण करा, तुम्हाला स्वाभिमान असेल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र स्थान निर्माण करा. तुमचं स्थान कसं आहे हे लोकांना दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी बंडखोरांना दिलं. (Sanjay RAut challanged rebellion) ज्या लोकांची हकालपट्टी करण्यात आली ते शिवसेना भाजप युती असताना पराभूत झाले आहेत. अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

बंडखोरांच्या नेत्यांना बोलावं लागतं, आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही. शिवसेनेची (Shivsena) ताकद आम्हाला माहिती आहे. गेल्या ५६ वर्षात ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत हा इतिहास आहे. इतिहास बदलण्याची ताकद या गटात नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे, मंत्र्यांची नियुक्ती होऊ शकत नाही. एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. राजकारणात एक दुजे के लिए हा नवा सिनेमा सुरु आहे. महाराष्ट्रात ‘एक दुजे के लिए’चा सिनेमा सुरु आहे त्याचा राजकीय अंत देखील त्याचप्रमाणं होईल, या सगळ्यांनी राजकीय आत्महत्या केलेल्या आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले.