TOD Marathi

शिंदे फडणवीस सरकारची दुसरी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. (Cabinet meeting of Maharashtra government) या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे नामांतर, नवी मुंबई विमानतळाचे नाव, विविध विकास कामांसाठी घेण्यात येणारे कर्ज अशा निर्णयांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याच पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षावरही कडाडून टीका केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सरपंच, नगराध्यक्ष निवडण्यासाठी जी पूर्वी खेळी करता येत होती ती आता थेट जनतेतून ही लोक निवडून येणार असल्याने करता येणार नाही, म्हणून त्यांना वाईट वाटतंय असं जोरदार टीकास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं. (Important decisions taken by government announced by CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis)

शिंदे फडणवीस सरकारने घोषित केलेले महत्त्वाचे निर्णय

  • शिंदे- फडणवीस सरकारचे निर्णय
  • औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचं पुन्हा नामांतर
  • कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून स्थगिती दिली होती
  • नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव
  • विकास कामांसाठी 60 हजार कोटींचं कर्ज उभारण्यास मान्यता, कोणताही प्रकल्प रखडू नये यासाठी तजवीज

असे महत्त्वाचे निर्णय या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतले. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल. विरोधी पक्षांचं कामच आहे विरोध करणे, असेही म्हणत विरोधी पक्षाचा चिमटा काढला.