TOD Marathi

मुंबई : राज्यात जून महिन्यात अपेक्षेप्रमाणं मान्सूनचा पाऊस पडला नाही मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. जून महिन्यात पाऊस न झाल्यानं खरिपाच्या पेरणीवर देखील त्याचा परिणाम झाला. जुलै महिन्यात सुरु झालेल्या अतिवृष्टीचा भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि रस्त्यांची दुरावस्था झाली असल्यानं मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Vegetable prize will be increased)

मुंबईला प्रामुख्यानं नाशिक, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून भाजीपाला पुरवठा केला जातो. मात्र, या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. भाजीपाल्याची आवक देखील घटली आहे. नाशिकहून मुंबईला होणारा भाजीपाला नेहमीच्या प्रमाणात फक्त ३० टक्के होत आहेत. त्यामुळं देखील भाजीपाला पुरठ्यावर परिणाम झाला आहे.

महाराष्ट्रात जून महिन्यात पावसानं दांडी मारली होती. आणि जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली ज्या चा शेतीला फटका बसला आहे. (Vegetable couldn’t be supplied because of heavy rain) जूनमध्ये पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या. आतापर्यंत केवळ ६० टक्के क्षेत्रावर पेरण्याच झाल्या आहेत. तर, मुंबईसह शहरांना होणाऱ्या भाजीपाला पुरवठा देखील कमी झाला आहे. भाजीपाल्याची आवक घटल्यानं आता भाजीपाल्याचे दर महागण्याची शक्यता आहे.