TOD Marathi

पुणे: महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यास मनसे नेते इच्छुक असल्याची चर्चा आहे. भाजपा सोबत युती करायची किंवा नाही याबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान, राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना तुर्तास भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करु नका, अशी सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे गेल्या दोन महिन्यांपासून पुणे दौरा करत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. मनसे नेत्यांच्या एका गटाने मनपा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही बाब राज ठाकरे यांच्या कानावरही घातली होती. मात्र यावर कसलीही चर्चा करू नका असे आदेश ठाकरेंनी दिले आहे.

पुणे मनपा मनसे स्वबळावर लढेल आणि निकालानंतर राजकीय समीकरणे पाहून युती केली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुणे मनसेचे अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी देखील भाजप-मनसे युती होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले होते.