TOD Marathi

टिओडी मराठी, सातारा, दि. 7 मे 2021 – सर्वाेच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचे मराठा आरक्षण रद्द केल्याने राज्यातील नेत्यांमध्ये विशेषतः मराठा समाजातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. खासदार उदयनराजेंनी देखील आज (शुक्रवार) न्यायालयाच्या निर्णायवर तीव्र नाराजी व्यक्ती केली आहे. तसेच त्यांनी आमदार खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका, अशी भूमिका घेऊन मराठा समाजाला सांगितले आहे.

उदयनराजे भाेसले हे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही प्रशासकीय कामानिमित्त आले हाेते. तेव्हा पत्रकारांनी उदयनराजे यांना मराठा आरक्षणाच्या निकालावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्ती केलीय.

या दरम्यान, आपल्या न्याय हक्कासाठी लढणा-या मराठा समाजाने आता आमदार आणि खासदारांना घरातून बाहेर पडू देऊ नये. त्यांना जाब विचारा, असेही खासदार उदयनराजेंनी नमूद केले आहे.