TOD Marathi

Facebook वर नको असलेल्या Comments Delete करायच्या आहेत का? ; जाणून घ्या ‘हि’ Process

टिओडी मराठी, दि. 26 जून 2021 – सध्या अनेक लोक फेसबुक वापरतात. आणि त्यावर अधिक प्रमाणात व्यक्त होतात. मात्र, काही लोकांचं व्यक्त होणं, इतर किंवा सर्वांना पटेल असं नाही.. बरोबर ना.. ? फेसबुक सोशल मीडिया कम्युनिकेशनचे एक माध्यम आहे. परंतु याच कम्युनिकेशनच्या प्रक्रियेत अनेकदा काही अनोळखी किंवा अज्ञात लोक कंमेट करतात आणि अशा लोकांना नियंत्रित करणे मुश्किल होतं. आता या लोकांना कंट्रोल कसं करावे?, असा प्रश्न पडतो. परंतु एका ट्रिकद्वारे फेसबुकवर अशा लोकांच्या कंमेट आपण थांबवू शकता.

Post Hide करण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या पोस्टवर जावे. त्यानंतर ३ डॉट ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. इथे Edit Privacy मध्ये जाऊन ‘Friends except’ वर टॅप करावे.

तसेच त्यानंतर त्या व्यक्तीला सिलेक्ट करून त्याला फेसबुक पोस्टवर हाईड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही हाईड केलेला व्यक्ती पोस्ट पाहू शकत नाही. तसेच कमेंटही करू शकत नाही.

तसेच फेसबुक पोस्टवर एखाद्याची कमेंट न आवडल्यास ती हाईड करता येते. त्यानंतर ती कंमेंट फ्रेंड लिस्टमधील लोकांना दिसणार नाही.

कमेंट हाईड करण्यासाठी फेसबुक कमेंट सेक्शनमध्ये जावे. त्यानंतर कमेंटवर लाँग प्रेस करावे. इथे हाईड कमेंटचा ऑप्शन दिसल्यानंतर त्यावर क्लिक करावे.

त्यानंतर ती कंमेंट हाईड होईल. ती कमेंट पुन्हा दिसावी असे वाटत असेल तर कमेंटवर लाँग प्रेस करुन अनहाईडचा पर्याय निवडावा.

फेसबुकवर लोकांना असे ब्लॉक करा :
फेसबुकवर एखाद्याला ब्लॉक करण्यासाठी Settings & Privacy > Settings > Blocking > Add to Block List मध्ये जावे. त्यानंतर त्या व्यक्तीला सिलेक्ट करावे आणि त्याला फेसबुकवर ब्लॉक करावे.