TOD Marathi

तुम्हीचं Facebook Login दुसऱ्या Mobile किंवा Computer मध्ये राहिलं असेल तर असं करा Logout ; जाणून घ्या, ‘हि’ प्रक्रिया

टिओडी मराठी, दि. 27 जून 2021 – जगात फेसबुकचे कोट्यवधी युजर्स असून अनेक जण या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अधिक प्रमाणात वापर करत असतात. जर तुम्हीचं फेसबुक लॉगइन दुसऱ्या मोबाईल किंवा संगणकामध्ये राहिलं असेल तर ते सहजरित्या लॉगआऊट करता येतं, याबाबत जाणून घेऊया प्रक्रिया.

काही वेळा आपण दुसऱ्या मोबाईल किंवा संगणकावर फेसबुक लॉगइन केलं तर, तिथं पासवर्ड सेव्ह होण्याची शक्यता असते. यामुळे त्या लॉगीनद्वारे चुकीचे मेसेज जाण्याची किंवा चुकीचा वापर होण्याचा धोका अधिक असतो. परंतु याच्या सेटिंगवरही लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. अनेकदा एखाद्या दुसऱ्याच्या डिव्हाईसवरुन फेसबुक लॉगइन केलं जातं.

दुसऱ्याच्या डिव्हाईसवर लॉगइन केल्यानंतर घाईत ते लॉगआउट करणं राहून जातं. यामुळे हॅकिंगचा धोका अधिक वाढतो. परंतु या समस्येपासून वाचण्यासाठी फेसबुक सेटिंगमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे. ज्यामुळे अकाउंट सेफ होण्यास मदत होणार आहे.

अशी आहे Facebook Account Setting –
– अनेकजण फेसबुकचा अधिक वापर स्मार्टफोनमध्ये करतात. दुसऱ्या फोनमध्ये तुमचं फेसबुक अकाउंट लॉगइन केल्यानंतर, ते लॉगआउट करण्याचे विसल्यास घाबरण्याची आवश्यकता नाही.

– अगोदर फोनमध्ये Facebook App ओपन करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जावे. त्यानंतर सर्वात खाली स्क्रोल करुन, सिक्योरिटी अँड लॉगइनचा हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करावे.

– सिक्योरिटी अँड लॉगइनवर टॅप केल्यानंतर इथे Where you are logged in असा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर एक लिस्ट ओपन होईल, त्यात अशा सर्व डिव्हाईसची माहिती दिली जाते जिथे जिथं तुम्ही तुमचं फेसबुक अकाउंट ओपन केलं होतं.

– या लिस्टमध्ये ज्या डिव्हाईसमधून अकाउंट लॉगआउट करायचं आहे, त्यावर क्लिक करुन लॉगआउट करा. यासाठी तीन डॉटवर क्लिक करावे. ते अकाउंट सिलेक्ट करावे, ज्याला लॉगआउट करायचं आहे. एकाच वेळी सर्व डिव्हाईसमधून देखील अकाउंट लॉगआउट करता येतं.