मुंबई: प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. यावर अंधेरी कोर्टातने १४ सप्टेंबर रोजी कंगना न्यायालयात उपस्थित राहीली नाही. त्यावर पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर झाली. मात्र यावेळी न्यायालयावरच आरोप केल्याची माहिती समोर आली आहे.
माझा या कोर्टावरील विश्वास उडाला आहे. मला या कोर्टातून दुसऱ्या कोर्टात केस ट्रान्सफर करायची आहे. अंधेरी कोर्टाच्या न्यायाधीशांवर कंगनानं गंभीर आरोप केले आहेत. न्यायाधीश वारंवार कंगनाला कोर्टात का बोलावत आहेत. अटक वॉरंट जारी करण्याची धमकी न्यायालयाने दोन वेळा देण्यात आली होती. तिचे वकील प्रत्येक सुनावणीला हजर होते. कंगना देखील याआधी कोर्टात आली होती. त्यामुळे तिला कोर्टात बोलवण्याची गरज का? या न्यायाधीशांवर विश्वास नाही, त्यांना बदलण्याची मागणी कंगनानं वकिलांमार्फत केली आहे.
कंगनाने एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावरच जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात अंधेरी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.