TOD Marathi

मुंबई : एम्पिरिकल डेटा तयार करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कोणतीही धडपड करत नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. सरकारनं धडपड केली असती तर आरक्षण गेले नसते, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळेस केली आहे

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मंत्रिमंडळात राहावेत यासाठी आघाडी सरकार प्रयत्न करत आहे.

दरम्यान राज्य ओबीसी आयोग कामाला लागला आहे. आजपासून आठ दिवस राज्यातील विविध विभागात ओबीसी आयोगाकडून दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आयोगाची स्थापना करुन इम्पिरिकल डेटा जमा करण्याचं काम सुरु केले आहे.