TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 8 मे 2021 – कोरोनाचा कहर राज्यासह देशात देखील आहे. मात्र, मुंबईतील कोरोनाची माहिती पाहता यात लपवाछपवी केली जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलाय. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात लिहलं आहे कि, मुंबईतील कोरोनाचे आकडे कमी होत आहेत, असे आभासी आकडे दाखवण्यासाठी लपवाछपवी केली जात आहे. त्यासह सेलिब्रिटी आणि पीआर कंपन्यांचा वापर केला जात आहे.

महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या, पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यू दर मागील काही दिवसांत कमी होत आहे. पण, राज्य सरकार खरे आकडे लपवून हे आभासी चित्र तयार करत असल्याचा आहे, असा आरोप विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. कोरोनामुळं झालेल्या मृत्यूचे आकडे सरकार लपवत आहे. मुंबईत कोरोनापेक्षा इतर कारणांमुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण प्रचंड वाढवून दाखवलं जात आहे, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हंटलं आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्यामागंही चाचण्या कमी करणं हे कारण आहे. 1 लाख क्षमता असतानाही केवळ 34 हजाराच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. त्यात अँटिजेनचं प्रमाण 30 टक्के आहे. ज्याठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या करणं शक्य आहे, तिथं अँटिजेनचं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये, असंही या पत्रात फडणवीस यांनी म्हटलंय. त्यासाठी फडणवीस यांनी दिवसानुसार आकडेवारी पत्रात मांडलीय. संसर्ग कमी होत असल्याचे दाखवण्यासाठी चाचण्या नियंत्रित केल्या जात आहेत, असे स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार असल्याचा दावा करताना पीआर संस्थेमार्फत जनतेपुढं चित्र निर्माण करण्याचं कारण काय? असा सवाल, फडणवीस यांनी पत्रात केलाय. हा प्रकार कोरोना विरोधातील सरकारचा संघर्ष कमकुवत करणारा आहे. त्यामुळं ही बनवाबनवी आणि पीआरमार्फत जनतेची दिशाभूल करणं थांबविण्याचे आदेश द्यावेट, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना या पत्राद्वारे केलीय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज