TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 8 मे 2021 – कोरोना साथ रोखण्यासाठी राज्य सरकारने 18 ते 44 वयोगाटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणी केली आहे. पण, मुंबईतील नागरिकांकडून लसीकरणासाठी पैसे घेतले जाताहेत. मग, लस मोफत देणार होते त्याचं काय झालं? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला केलाय. प्रवीण दरेकर मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रत्येक मुंबईकराला लससाठी ३०० रुपये पकडले तर दीडशे कोटीच्या आसपास मुंबईकरांना मोफत लससाठी लागतात. तथापि, खासगी रुग्णालय असतील, वैद्यकीय संस्थामार्फत पैसे देऊन लसीकरण करण्याचं प्रयोजन काय? तिथे जर पैसे देऊन लसीकरण केलं जात असेल तर मोफत लसीकरणाचं काय झालं? असा थेट सवाल प्रवीण दरेकर यांनी सरकारला केलाय .

मुंबई महानगर पालिकेच्या वतीने मुंबईकरांचे मोफत लसीकरण करा, अशी मागणी दरेकर यांनी केलीय. लसीच्याबाबतीत केंद्राकडे सातत्याने बोट दाखवलं जातंय. महाविकास आघाडीचे मंत्री, नेते आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहेत. ते त्यांनी थांबवलं पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.

आतापर्यंत महाराष्ट्र राज्याला देशाच्या प्रमाणात ३ टक्के लोकसंख्या असताना १२ टक्के लस केंद्राने दिलीय. ३५ लाख अधिक लस केंद्राकडून मिळाल्या आहेत. महाराष्ट्राला मुबलक लस उपलब्ध होत असूनही केवळ राजकारणासाठी असं वक्तव्य केलं जातंय, असं दरेकर म्हणाले.

तसेच लसीकरणासाठी काय नियोजन केलं?, हे जनतेसमोर यायला हवं. केंद्राकडून समन्यायी लस यायला हवीय, अशी मागणी करतो. मग, राज्यात हि समन्यायी लस वाटप होते का? हेहि समोर यायला हवं, असं प्रवीण दरेकर म्हणाले.