नवी दिल्ली: हिंदुंमध्ये पवित्र मानल्या जाणा-या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. त्यानंतर आता तिरुमाला तिरुपती देवस्थान आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रामदेव बाबा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी केली आहे.
रामदेव बाबा म्हणाले की, या जगासाठी सर्वात मोठा धोका हा जातीय दहशतवाद, आर्थिक दहशतवाद, राजकीय दहशतवाद आणि मेडिकल दहशतवादापासून आहे. मेडिकलवाल्यांबाबत मधे मी बोललेलो तेव्हा मोठा गोंधळ उडाला होता. राजकीय दहशतवाद सर्वात वर आहे, जातीय दुसऱ्या क्रमांकावर, असं ते यावेळी म्हणाले.
धर्माच्या नावावर राम नाम जपना, पराया माल अपना. हा कोणता संन्यास आहे. काही लोक संन्यासी होतात, लाडू खाऊन आपल्याला लोकांनी संन्यासी म्हणावे, अशी या लोकांची अपेक्षा असते. आपण एकाच देवाची मुले आहोत. एकाच धरतीवर राहतो असे सर्वांनी म्हणायला हवे, असंही रामदेव बाबा यावेळी म्हणाले होते.