TOD Marathi

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करा. मंत्रालय सुरक्षेबाबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अधिक सतर्कतेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Home Minister Devendra Fadnavis)

राज्यात ५२९७ उमेदवारांचे पोलीस प्रशिक्षण सुरु आहे, तर सन २०२० मधील ७२३१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच मागणी करण्यात आलेल्या आणखी १० हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी (DCM Devendra Fadnavis ordered, Present proposal of 10 thousand Policemen requirement) सादर करण्याच्या सूचना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया वेगाने होईल आणि लवकरात लवकर पोलीस भरती होईल, अशी अपेक्षा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना आहे. महाविकास आघाडी सरकार असताना देखील पोलीस भरती होईल अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, अडीच वर्षात भरती होऊ शकली नाही. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने पोलीस भरती संदर्भात घोषणा केली आहे.