TOD Marathi

दहीहंडी असं म्हटलं तरी लहान थोरांच्या मनात एक उत्साह येतो. गेले दोन वर्ष कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना या सगळ्या सणासुदीला देखील हवा तो आनंद लुटता आला नाही. या वर्षी गोपाळकाला अर्थात दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सोबतच दहीहंडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. (MLA Pratap Sarnaik Writes Letter To CM Eknath Shinde to Declare Public Holiday On Dahihandi)

प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik MLA) म्हणाले की, दहीहंडी हा लोकप्रिय सण असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळाल्यास सर्वांना उत्सवाचा आनंद लुटता येईल. मुंबई-ठाणे या शहरांबरोबरच राज्यातील इतर लहान शहरांमध्येही या उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झालं आहे. महाराष्ट्राबरोबरच देश- विदेशातही हा सण लोकप्रिय झाला असून भारतात स्पेनसारख्या देशातून यासाठी स्पर्धक येतात. कोविडमूळे दोन वर्ष या सणावर विरजण पडलं होतं. पण आता परिस्थिती बदलल्याने तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह आहे.


यापूर्वीपासूनच मी या मागणीचा आमदार या नात्यांना शासनाकडे पाठपुरावा करत आहे. दहीहंडीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारातून केवळ मुंबई आणि ठाणे विभागाला सुट्टी जाहीर केली जाते, पण सार्वजनिक सुट्टीसाठी शासन स्तरावर अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला गेलेला नाही.
यंदा 19 ऑगस्ट 2022 ला दहीहंडीचा सण असून मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) या सुट्टी बाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.