TOD Marathi

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. गोवंडीमधील शिवाजीनगर परिसरातील एकाच घरात चौघांचे मृतदेह आढळले आहेत. (4 dead bodies from 1 family found in Gowandi, Mumbai) एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शकील जलील खान (34 वर्षे), राबिया शकील खान (25 वर्षे), सरफराज शकील खान (7 वर्षे) आणि अतिफा खान (3 वर्षे) अशी मृतदेह आढळलेल्या चौघांची नावे आहेत.
पती शकीलव खान यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला तर इतर तिघांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. पतीने पत्नी आणि मुलांना विष देऊन स्वत: आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.