चीनमध्ये कोरोनाने (Corona in China) पुन्हा डोके वर काढल्याने तिथे टाळेबंदी करण्यात आली आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर (International Market) झाला आहे. मागणी घटल्याने कच्च्या तेलाच्या किमती (Crude oil prices) गेल्या आठ महिन्यातील निचांकी स्तरावर पोहचल्या आहेत.
क्रूड ऑईल, डबल्यूटीआयच्या किंमतीत 6 टक्क्यांची घसरण झाली. कच्चे तेल 83 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. जुलै महिन्यानंतर इंधन दरात आलेली ही सर्वात मोठी घसरण आहे. चीनमधील अनेक भागात सध्या लॉकडाऊन असल्याने कच्च्या तेलाची मागणीही घटली आहे. ब्रेंट ऑईल गुरुवारी सकाळी 0.81 टक्के म्हणजे 88.69 वर व्यापार करत होता.
राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोलच्या किंमती 96.72 रुपये आणि डिझेलचे दर 89.62 रुपये प्रति लिटर होते. मुंबईत पेट्रोलचे दर 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर विक्री होत आहे. कोलकाता मध्ये गुरुवारी पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या किंमती 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव 102.63 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा भाव 94.24 रुपये प्रति लिटर आहे.