TOD Marathi

मुंबई :
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीच्या सुशोभिकरणाच्या मुद्द्यावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्रीपद आणि महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली, आणि मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणास अलिखित संमती दिली, असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

याकूब मेननच्या कबरीवर करोनाच्या काळात सौंदर्यीकरण करण्यात आलं. सरकारच्या अलिखित संमतीनेच हा प्रकार घडला. देशद्रोह्याच्या कबरीचे सुशोभिकरण केले, याचा भाजप निषेध करते, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासोबत कुठे अॅडजस्ट केली, कसं कॉम्प्रोमाईज हे अनेक उदाहरणांनी स्पष्ट झालं, मात्र मुख्यमंत्रीपद आणि महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी आपण या तडजोडी करत असल्याचं उद्धव ठाकरेंनी मान्य करावं, अशी मागणी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.