टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 ऑगस्ट 2021 – भारत आणि युगांडामध्ये कोविशील्ड लसीचे बनावट डोस आढळले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. याला सिरम इन्स्टिट्युटने याला दुजोरा दिलाय. त्यामुळे अशा बनावट लसीमुळे लसीकरणाची भिती पुन्हा वाटू लागली आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.
देशात लसीकरणाची मोहीम राबवली जात असून आता १८ वर्षांपासून पुढच्या व्यक्तींना लस दिली जातेय. कोविशिल्ड, कोवॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जाताहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अशा बनावट लसीमुळे लसीकरणाची भिती पुन्हा वाटू लागली आहे.
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं मंगळवारी यासंदर्भातला इशारा आपल्या संकेतस्थळावर दिलाय. जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासणी विभागाकडून ही माहिती दिली आहे. भारतात कोविशिल्ड लसीच्या २ एमएलच्या वायल्स आढळल्या आहेत.
पण, वास्तवात सिरम इन्स्टिट्युटकडून २ एमएलच्या वायल्स तयार केल्या जात नाहीत. तर, दुसरीकडे युगांडामध्ये १० ऑगस्टला एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोविशिल्ड लसींची एक बॅच दिसली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात काळजी घ्यावी, असे आवाहन या देशांना केलं आहे.
बनावट लसी नष्ट करा –
अशा प्रकारच्या बनावट लसी जागतिक आरोग्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे करोना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगितलं आहे.
या बनावट लसी तातडीने शोधून काढून नष्ट केल्या पाहिजेत. हेच लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे, असे WHO ने आपल्या वेबसाईटवर नमूद केलंय.