टिओडी मराठी, दि. 27 जून 2021 – करोना विषाणूने जगात थैमान घातलं आहे. करोनाळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांत करोना संसर्गाच्या लाटा येत आहेत. पूर्णपणे करोनामुक्त झालेल्या देशांत करोनाने पुनरागमन केलंय. त्यात आता करोना विषाणूबाबत महत्त्वपूर्ण संशोधन समोर आलंय.
करोनाचा प्रादुर्भाव चीनमधून झाला असला तरी संशोधनात करोना विषाणूने पृथ्वीवर पुनरागमन केले आहे, असे समजतं. हा विषाणू सुमारे २० वर्षे जुना आहे, असे संशोधनात समोर आलं आहे.
एवढंच नव्हे तर करोनाने याअगोदर पृथ्वीवर अनेकदा वेगवेगळ्या रुपात थैमान घातलं आहे. तेव्हा हि अनेकांना करोनामुळे आपला प्राण गमवावा लागला होता.
‘करंट बायोलॉजी’ या मासिकाने या संदर्भातील संशोधन प्रसिद्ध केलंय. करोनाचा जन्म 20 हजार वर्षांपूर्वीचा आहे. या विषाणूचे अवशेष चीन, जपान व व्हियतनाममधील नागरिकांच्या डीएनएमध्ये सापडल्याचा दावा संशोधकांनी केलाय.
या संशोधनासाठी जगातील 26 देशातील 2,500 लोकांचे जनुके घेतले होते. मानवाच्या शरीरामध्ये 42 वेगवेगळ्या जनुकांत करोनाच्या फॅमेलीचे अंश आढळलेत.
सध्याच्या लोकसंख्येतील 42 जनुकांत करोनाचे अनुवांशिक घटक सापडलेत. यात MERS व SARS या विषाणूंचा हि समावेश आहे. यामुळे जगात मागील २० वर्षांत अनेक घातक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढलाय.