TOD Marathi

नवी दिल्ली: कोरोना विषाणूनं जगभरात हातपाय पसरले आहे. यातच कोरोनाच्या वेगवेगळया व्हेरियंटचा कहर आणि सोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनेही नागिरकांची चिंता वाढवली आहे. अशातच कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट समोर आला आहे.

कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरियंटची दहशत असतानाच आता कोरोनाचा नियोकोव व्हेरियंट समोर आला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या भीतीत आणखी वाढ झाली आहे. नियोकोव हा नवा व्हेरियंट वुहान येथे संशोधकांना सापडला आहे.

या विषाणूमुळे मानवांना धोका आहे की नाही, हे शोधण्यासाठी आणखी अभ्यास करणे आवश्यक असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये नियोकोव हा नवीन प्रकारचा व्हेरियंट आढळून आला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नियोकोव हा नवीन कोरोना व्हायरस कोरोनापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. आधीच अल्फा, डेल्टा, ओमिक्राॅन यांसारख्या अनेक व्हेरियंटनं नागरिकांना धास्तावून सोडले आहे.