TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 6 मे 2021 – वाढत्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यामध्ये होणाऱ्या सर्व ऑफलाईन परीक्षा रद्द केल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीकडून गुरुवारी दिली आहे. युजीसीने यासंदर्भात देशभरातील सर्व विद्यापीठे तसेच राज्य सरकाररांना पत्र लिहून माहिती दिलीय.

मे महिन्यामध्ये कोणत्याही ऑफलाईन परीक्षा घेऊ नयेत, असे युजीसीने पत्रात नमूद केलं आहे. जून महिन्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षांच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल.

शैक्षणिक संस्थामध्ये सोशल डिस्टन्स पाळण्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मे महिन्यात आयोजित केलेल्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, केंद्र सरकार, राज्य सरकारे, शिक्षण मंत्रालय आदींच्या दिशानिर्देशानुसार स्थानिक स्थितीचा विचार करून उच्च शिक्षण संस्था ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे निर्देशामध्ये स्पष्ट केले आहे.

सध्या जिल्ह्यासह राज्य आणि देशातील अनेक ठिकाणी कोरोनाचा कहर दिसून येत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट अली असून अद्याप यावर म्हणावं तसं नियंत्रण आरोग्य यंत्रणेला आलेलं नाही. त्यामुळे अशा काळात ऑफलाईन परीक्षा घेणे म्हणजे जीवाशी खेळ केल्यासारखे ठरत आहे. त्यामुळे अनेक विद्यापीठाने ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन परीक्षेचा मार्ग स्वीकारला आहे.