TOD Marathi

गणेश उत्सवानिमित्त कल्याणमध्ये विजय तरूण मित्र मंडळाने ‘मी शिवसेना बोलतोय’ असं म्हणत एका वटवृक्षाचा देखावा साकारला होता. (Vijay Tarun Mandal Ganpati Festival Political Scene) मात्र या देखाव्यावर आक्षेपार्ह देखावा म्हणत कारवाई करण्यात आली. त्यानंतर विजय तरूण मित्र मंडळाने या कारवाई विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. या कारवाई वरती न्यायालयाने सुनावणी करत काही अटी शर्तीवर देखावा दाखवण्यास परवानगी दिली आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले असून शिंदे गट व ठाकरे गट (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) यामध्ये आरोप प्रत्यारोप त्याचबरोबर सोशल मीडियापासून बॅनरबाजीपर्यंत एकामेकांविरोधात निष्ठेची टीका केली जात आहे. नेमकी शिवसेना कोणाची व खरे शिवसैनिक कोण हे दाखवण्यासाठी दोन्ही गटातील कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून आपली निष्ठा दाखवत आहे.

अशाच प्रकारे कल्याणातील ठाकरे गटातील पदाधिकारी विजय साळवी यांच्या विजय तरुण मंडळाने यंदा गेल्या तीन महिन्यात शिवसेनेत ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर आधारित “पक्ष निष्ठा” या विषयावर चलचित्र देखावा साकारला आहे.

मी शिवसेना बोलतेय इथून या चलचित्र देखाव्याची सुरूवात करण्यात आली असून शिवसेनेला मोठा वृक्ष दाखवण्यात आला आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा प्रकारचा हा देखावा केला होता. या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेत कारवाई करत देखाव्याची सामुग्री जप्त केली होती. पोलिसाच्या या कारवाईनंतर ठाकरे गटातील कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख व विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत यंदा गणेश मूर्तीची स्थापना न करत या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरती सुनावणी झाली न्यायाधीशांनी अटी शर्तीवर सदर मंडळाला देखावा दाखवण्याची परवानगी दिली आहे.