TOD Marathi

सध्या देशभरात गणेश उत्सवाचा उत्साह आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. (MNS Chief Raj Thackeray visisted Siddhivinayak Temple, Mumbai along with family) यावेळी त्यांच्यासह कुटुंबीय देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे पुत्र अमित ठाकरे,स्नुषा मिताली ठाकरे आणि नातू कियान देखील उपस्थित होते. (Amit Thackeray) यावेळी सिद्धिविनायक संस्थांनकडून राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला. सिद्धिविनायकाची मूर्ती आणि शाल देऊन त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी होऊन राजकीय नेते, सेलिब्रिटी, यांच्यासह सर्वसामान्य नागरिक देखील येत असतात. या वर्षी राज ठाकरे यांच्या घरी देखील गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच राज ठाकरे यांचे नातू कियान ठाकरे हेही घराबाहेर दिसले.

सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील अन्य गणपती बाप्पांचे दर्शन घेणार असल्याचे कळते.