TOD Marathi

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची चर्चा जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात हा राजकीय भूंकप आहे. या महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे पडसाद दिल्लीतही उमटले असून याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली आहे. राज्यातील या नाराजीनाट्याचा काँग्रेसला फटका बसू नये याची जबाबदारी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर सोपवली आहे. (Kamal Nath will come in Maharashtra)

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांना निरीक्षक म्हणून नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला असून कमलनाथ मुंबईत दाखल झाले आहेत. (Maharashtra Congress) कमलनाथ हे मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली जाते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Kamal Nath will meet Sharad Pawar and Uddhav Thackeray)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर राज्यात काल सकाळपासून बैठकांचा जोर वाढला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी पक्षश्रेष्ठी आणि आमदारांची खलबते सुरू असतानाच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीसुद्धा याची गंभीर दखल घेतली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थती हातळण्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यावर सोपवली आहे.

कमलनाथ हे गांधी कुटुंबीयांच्या सर्वांत जवळच्या व्यक्तींपैकी एक असे व्यक्तिमत्त्व आहे. काँग्रेसच्या कठीण काळात गांधी परिवाराच्या पाठीशी ते कायम उभे राहिले आहेत. त्यामुळेच काँग्रेसने महाराष्ट्राची जबाबदारी कमलनाथ यांच्या खांद्यावर सोपवली आहे. कमलनाथ आज, बुधवारी मुंबईत बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यानंतर ते सर्व आमदारांची बैठक घेणार असल्याचीही माहिती आहे. (Kamal Nath meeting congress MLA)

दरम्यान, या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या पराभवाबाबतही चर्चा केली जाईल, असे बोलले जात आहे.