TOD Marathi

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Abbasi govt) सरकार अडचणीत सापडलं आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये असलेल्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुढे नेमकं कोणतं पाऊल उचलणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Milind Narvekar met Ekanath Shinde)

काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्री शिवसेना आमदारांना सुरतमधील हॉटेलमधून एअरलिफ्ट करण्याची शक्यता आहे. त्यांना अहमदाबाद किंवा मुंबईपासून २७०० किमी दूर आसाममधील गुवाहटी येथे घेऊन जाण्यात येणार असल्याचं कळतय. संबंधित आमदारांना घेऊन जाण्यासाठी सुरत विमानतळावर तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी तीन चार्टर्ड विमानं सज्ज असल्याचंही सांगण्यात येत आहे. (Shivsena mla in Gujrat to airlift in Assam)

सुरत विमानतळ आणि शिवसेना आमदार मुक्कामी असलेल्या सुरतमधील हॉटेल ली मेरेडियन परिसरात पोलिसांच्या हालचाली वाढल्याचं समजत आहे. बंडखोरी फसू नये, यासाठी आमदारांना मुंबईपासून २७०० किमी दूर गुवाहटीला घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे आज रात्री महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.